नवी मुंबईत खंडणी प्रकरणी पत्रकार व त्याच्या महिला साथीदारास अटक*
नवी मुंबईत खंडणी प्रकरणी पत्रकार व त्याच्या महिला साथीदारास अटक*
kKP Media Network📡
================================
येथील तुर्भे परिसरातील ऑर्केस्ट्रा बार सुरु ठेवायचा असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांपैकी एक पत्रकार असून दुसरी त्याची महिला साथीदार असल्याचे बोलले जात आहे. दोघांवर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये संदीप रासकर आणि सोनाली दुनघव अशी दोघांची नावे आहेत. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेवन सिक्स व एमएच ४३ नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहेत. या बार संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी देखील आहेत. या बार च्या ठिकाणी काही दिवसापूर्वी दोन्ही आरोपी आले होते. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधत तुमच्या बार विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करायची नसल्यास तसेच बार सुरु ठेवायचा असेल तर दोन लाख रुपयांची मागणी केली. सदर मागणी मान्य न झाल्यास पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देत हजारोंच्या संख्येने बार वर महिलांचा मोर्चा आणून बार वर हल्ला करत बार उध्वस्त केला जाईल असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून तक्रार केली जाईल अशी धमकीही देण्यात आली.त्यामुळे हॉटेल प्रशासनाने तडजोड करीत २ ऐवजी एक लाखांची खंडणी देण्याचे ठरले या पैकी २५ हजार रुपये बळजबरीने घेत तेथून निघून गेले.
याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असता तक्रारीची शहानिशा करीत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि तात्काळ हालचाल करीत पुणे येथील रहिवासी असलेला पत्रकार संदीप रासकर याला अटक केली.

Comments
Post a Comment